डॉन नदी
डॉन नदी : (तातार, डून; प्राचीन टॅनीअस). यूरोपीय रशियातील एक मोठी महत्त्वाची नदी. लांबी १,८७० किमी.; जलवाहनक्षेत्र सु. ४,२२,००० चौ. किमी. तिच्यावरील मोठ्या प्रकल्पांमुळे, तिच्या प्रदेशात होणाऱ्या डॉनशांपेन या मद्यामुळे आणि तिच्या मुखाजवळच्या प्रदेशातील अवखळ, लढाऊ व स्वतंत्र वृत्तीच्या डॉन-कोसॅक लोकांमुळे ती विख्यात आहे.